ब्राह्मण समाज हा जेमतेम साडेतीन टक्के उरला आहे. त्यात भिक्षुकी, पोटशाखा, नोकरी, व्यवसाय, उच्चशिक्षण, शाकाहार अशा असंख्य अडचणींमुळे ब्राह्मण वधू-वरांच्या विवाह समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. पैकी अनेकांचा प्रेमविवाह झाल्याने आंतरजातीय विवाहाची भर पडत आहे. त्यामुळे उपेक्षित ब्राह्मण वधू-वरांच्या समस्या जटिल होऊ लागल्या आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणजे सुयोगरानडे विवाहसंस्था!
विवाह जुळवणे हा आमचा पिढीजात व्यवसाय नसला, तरी हा समाजकार्याचा वसा मला माझ्या आई वडिलांकडून मिळाला. आई -वडील श्री.मधुकर रं.रानडे व सौ.वसुधा मधुकर रानडे यांनी त्यांच्या काळात बरीच लग्न जमवली. कितीतरी दाखवण्याचे कार्यक्रम,साखरपुड्याचे कार्यक्रम आमच्या घरी झालेले मी लहानपणापासून बघत होतो. माझी स्वतःची मयुरेश फार्मा नावाची आयुर्वेदिक औषधांची कंपनी आहे तसेच काही नामवंत आयुर्वेदिक कंपन्यांची व जनरल एटमच्या कंपन्यांची संपूर्ण महाराष्ट्राची एजन्सी आहे. व्यवसायानिमित्त माझे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणे होते. फिरताना माझ्या लक्षात आल की आज -काल मुला -मुलींच लग्न ही एक खुप गंभीर समस्या झाली आहे आणि पुर्वी ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हती. ह्या समस्येवर तोडगा म्हणून Whats Up ह्या सोशल मीडियाचा वापर करून 'स्नेह बंध ब्राम्हण वधू -वर' ह्या नावाने विनामूल्य सेवा देणारा एक वधू -वर चा ग्रुप स्थापन केला.
ह्या ग्रुप तर्फे विविध वयोगटातील, विविध क्षेत्रातील, महाराष्ट्राच्या विविध भागातील 20 लग्न जमलीत अश्या प्रकारे प्रतिसाद वाढल्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजेच 24/6/17 रोजी ब्राह्मण समाजातील फक्त उच्चशिक्षित मुला -मुलींसाठी म्हणुन 'सुयोग ब्राम्हण वधू -वर' ह्या नावाने एक वेगळा ग्रुप सुरु केला पण त्याला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि अल्पावधीतच तो ग्रुप फुल झाला व त्यानंतर प्रतिसाद इतका वाढला की ह्या 9 महिन्यात माझे सुयोग ब्राम्हण वधू -वर चे एकुण 13 ग्रुप तयार झालेत आणि ते सर्वच्या सर्व फुल झालेत,तसेच मी कोकणस्थ ब्राम्हण वधू -वर व उच्चशिक्षित कोकणस्थ ब्राम्हण वधू -वर हे 2 स्पेशल कोकणस्थ मंडळींसाठी ग्रुप स्थापन केलेत व घटस्फोटीत /विधवा /विदुर मंडळींकरता ब्राम्हण घटस्फोटीत वधू -वर ह्या नावाने पण एक ग्रुप स्थापन केला. असे एकुण 20 ग्रुप स्थापन केलेत व त्या माध्यमातुन गेल्या 9 महिन्यात जवळजवळ 89 लग्न ठरलीत म्हणजेच एकुण 109 लग्न ह्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून ठरलीत. वैशिष्टय म्हणजे कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला एकाच ग्रुपवर ऍड केले जाते. म्हणजेच ह्या माध्यमातुन जवळजवळ 4500 स्थळे एकत्र आलीत.
हे सर्व करण्याचा मुख्य उद्देश हाच होता, की समाजातील लोप पावत चाललेला संवाद पुन्हा प्रस्थापित व्हावा. त्यासाठी ग्रुपचा एक स्टेंडर्ड फोर्मेट तयार केला व त्यात जाणीवपूर्वक काही गोष्टी टाकल्या नव्हत्या कारण निदान पूर्ण माहिती मिळवायच्या कारणाने तरी एकमेकांशी संवाद साधतील आणि काहीअंशी तो उद्देश पण सफ़ल होईल.
हे सर्व करतांना खुप चांगले -वाईट अनुभव आले त्यात चांगल्या अनुभवांच प्रमाण जास्त आहे पण काही लोकं पत्रिका देणं तर सोडाच पण लोकं लग्न ठरल्यावर साध सांगायच सौजन्य ही दाखवत नाही,अशी परस्पर ठरलेली लग्नही खुप आहेत त्याची वरील आकड्यांत नोंद नाहीये.
असो, तर माझ्या व्यवसायाचा व्याप सांभाळून हे इतके ग्रुप सांभाळण,रोज नवनवीन येणारे कॉल अटेंड करण त्यांना ग्रुप वर ऍड करण,आलेल्या मेसेजला रिप्लाय देणं फार कठीण होऊन गेलं आहे आणि दिवसंदिवस हा व्याप खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे माझ्या मुख्य बिजनेसकडे लक्ष द्यायला मला अजिबातच वेळ मिळत नाहीये. त्यामुळे आता वेबसाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मंगळवार दिनांक 3/4/18 रोजी अंगारीका चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आपण ती सुरु करणार आहोत वेबसाईटमुळे सर्व ग्रुपवरची स्थळं आपल्याला बघायला मिळतील तसेच Whats Up ला 256 मेंबर ची मर्यादा असल्याने एका व्यक्तीला एकाच ग्रुपवर ऍड करता येत त्यामुळे इतर ग्रुपवरील स्थळं बघता येत नव्हतं पण आता वेबसाईट सुरु झाल्यावर कोणत्याही ग्रुपवरील स्थळं बघता येतील तरी सर्व ग्रुपमेंबरनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करुन घ्यावे व आपल्या परिचित,नातेवाईक,मित्रमंडळी यांना ह्या वेबसाईट बद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करायला सांगावे हि विनंती.
श्री.सुयोग मधुकर रानडे
मुख्य संस्थापक ग्रुप ऍडमीन

संकेतस्थळाचे प्रयोजन

Whats Up ग्रुपला 256 मेंबरची मर्यादा असते त्यामुळे बऱ्याच इच्छुक मंडळींना ग्रुप ऍड करता येत नाही पण वेबसाईटमुळे तो प्रॉब्लेम राहणार नाही शिवाय माझ्या परिचयात महाराष्ट्राच्या विविध भागातील हौशी,छोटी व्यवसायीक वधू -वर केंद्र बरीच आहेत त्यांच्याकड़ील स्थळं पण वेबसाईट वर अपलोड केल्या जातील शिवाय ठिकठिकाणी जे मेळावे होतात तिथली स्थळं सुद्धा अपलोड होतील.
ह्या सर्व गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो व हे सर्व मेंटेन करायला पण पैसा लागतोच म्हणुन आपण ह्याची नॉमिनल फी ठेवणार आहोत ह्यात एकदा फी भरली की किमान 1 वर्ष तरी आपण कुठलेच रीनीवल चार्जेस घेणार नाही आहोत आणि मुख्य म्हणजे फी घेत असतांना इतर व्यवसायीक वधू -वर मंडळांसारखा पूर्णतः व्यवसायीक दृष्टिकोन आपला नसेन आपण "पौरौहीत्य, भिक्षुकी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिकडुन अजिबात पैसे घेणार नाही" त्यांना वेबसाईट वर नावं रजिस्टर करण्यासाठी पैसे लागणार नाही. त्यांचा स्वीकार करणाऱ्या मुलींच्या स्थळांची यादीत वेगळी तयार करण्यात येईल कारण आज त्यांची लग्न हि एक फार गंभीर समस्या झाली आहे आपल्या धर्माचे ते आधारस्तंभ आहेत आणि माझ्या औषधांच्या व्यवसायानीमीत्य मी संपुर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो तेव्हा त्या त्या ठिकाणाहुन पण काही स्थळं मिळतात का ह्यासाठी मी प्रयत्नशील राहील
महाराष्ट्राच्या विविध भागात मुंबई,पुणे येथे तसेच कर्नाटक (बेंगलोर, धारवाड़, कारवार, बेळगांव, हुबळी), मध्यप्रदेश, हैद्राबाद, गुजरात,छत्तीसगढ़,दिल्ली,युपी ह्या इतर राज्यात जे कोणी फ्रेंचेसी (शाखा ) घेण्यासाठी गरजवंत,हौशी इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा त्यांना ह्या कार्याचा योग्य तो रीतसर मोबदला दिल्या जाईल त्यांनी त्या भागतील स्थळांची माहिती फक्त घेऊन वेबसाईट वर अपलोड करायची किंवा त्यांची माहिती भरुन पाठवायची किंवा काहीच नाहि जमलं तर फक्त संपर्क क्रंमाक कळवायचे त्याच त्यांना योग्य ते कमीशन मिळेल जेणेकरुन आपल्या समाजातील विशेषतः स्त्रियांना ह्यातून रोजगार मिळेल व छान वेळ पण जाईल नवीन नवीन चांगल्या लोकांशी ओळखी पण होतील व सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या माध्यमातुन कोणाच तरी भलं झालं ह्याच पैशात न मोजण्याइतकं समाधान प्राप्त होईल. तसेच दर 3/4 महिन्यांनी आपण वेबसाईट वरील स्थळांची यादी पण आपल्या रजिस्टर मेंबरला पाठवत जाऊ.
आमच्या यशाचा आलेख : फक्त उच्चशिक्षित मुला -मुलींचे 14 ग्रुप आहेत व त्यातील 13 तर पूर्णपणे फुल आहेत म्हणजे अंदाजे 3200 मुला -मुलींचे स्थळं तर फक्त ह्या ग्रुप वर आहेत आणि इतर 6 ग्रुप पण फुल आहेत त्यात कमी उत्पन्न वाली मंडळी आहे म्हणजे ते जवळजवळ 1200 स्थळं आहेत शिवाय घटस्फोटीत व विधवा /विदुर मंडळींचा पण एक ग्रुप आहे आणि शिवाय वेटिंग वर 100 स्थळं आहेत आणि रोजची किमान 25 ते 30 नवीन स्थळं येत असतात. ह्या ग्रुप तर्फे अवघ्या ९ महिन्यात विविध वयोगटातील,विविध क्षेत्रातील, महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १०० लग्ने झाली आहेत. तसेच विधुर माणसाचा किंवा विधवा स्त्रीचा त्यांच्या अपत्यासह स्वीकार केला आहे. हे आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे.

विशेष-आपल्या ह्या वेबसाईट वर पौरौहीत्य करणारे व विकलांग(फिजिकली हॅण्डीकॅप्ट) व ज्यांची खरोखरच परिस्थिती नाहीये अश्यांकडुन कोणत्याही प्रकारची फी घेत नाही